
जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज इन्स्टिट्यूटमध्ये दिंडी सोहळा
नाणीज, दि. ६: येथील जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज एज्युकेशनल इन्स्टिट्यूट या प्रशालेमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी प्रशालेच्या बालचिमुकल्यांनी आषाढी वारी दिंडी सोहळा साजरा केला. यावेळी मुलांनी रिंगण, फुगडी, करवत कणा, अभंग गायन असे कार्यक्रम सादर केले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला गुरुमाता सौ सुप्रियाताई, मुख्याध्यापिका डॉ.अबोली पाटील व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन केले. पालखीचे पूजन करून टाळ – मृदंगाच्या गजराच्या दिंडीचे प्रथम मुख्य मंदिराकडे झाले. बालचिमुकले विठ्ठल- रुखुमाई, महाराष्ट्रातील विविध संतांच्या वेशभूषा करून दिंडीमध्ये सहभागी झाले होते.

प्रशाले मधून निघालेली दिंडी विठ्ठलाच्या नाम घोषात मुख्य मंदिरामध्ये नेण्यात आली. तेथे दिंडीचे स्वागत करण्यात आले.पालखी आत घेण्यात आली. प्रथा परंपरेप्रमाणे या पालखीचे स्वागत देखील करण्यात आले.भारतीय संस्कृतीचा वारसा तसेच संतांनी केलेली कार्ये विद्यार्थ्यांना समर्पकरीत्या काळावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा पालखी सोहळा प्रशालेच्या वतीने प्रतिवर्षी संपन्न केला जातो.मंदिरामध्ये विद्यार्थ्यांनी वेगवेगळे अभंग सादर केले. यावेळी रिंगण सोहळा झाला. त्यात परंपरेने चालत आलेल्या टाळ मृदुंगाच्या व विठ्ठल नामाच्या गजरात पावली खेळण्यात आली. ध्वज पताकांचे अनोखे प्रदर्शन, मुलांनी फुगडी, काटवट कणा हे खेळ खेळले. त्यानंतर संत गोरा कुंभारांची एक अप्रतिम नाटुकली विद्यार्थ्यांनी सादर केली.ती पाहताना बघण्याच्या अंगावरती शहारे येत होते.आपण भगवंताचे नामस्मरण जेवढे एकाग्रतेने करतो तेवढाच भगवंत आपला पाठीराखा असतो हे विद्यार्थ्यांनी आपल्या नाटुकली मधून प्रदर्शित केले.
देवयोगी यांनी कौरव व पांडव तसेच यादव कुळातील भगवान श्रीकृष्ण यांच्याविषयीची एक कथा सादर केली . यावेळी अभंग स्पर्धा झाल्या. त्यामध्ये प्रथम तीन क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देन्यात आल्या. गुरुमाता सौ सुप्रियाताई यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना दाद देत त्यांचे कौतुक केले. कृतीतून शिकण्यासारखे भरपूर काही असते हे त्यांनी संत गोरा कुंभारांच्या एका दाखल्यातून सर्वांना पटवून दिले. सूत्रसंचालन कु. यशश्री पाटील व काव्य विंचू या विद्यार्थ्यांनी केले. आरतीनंतर पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.फोटो ओळी -नाणीजक्षेत्री जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज इन्स्टिट्यूटमध्ये रविवारी काढण्यात आलेली बालचिमुकल्यांची दिंडी.