
योगेंद्र राजन हेळेकर यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन
रत्नागिरी शहरातील प्रसिद्ध व प्रतिष्ठित ‘हेळेकर मिठाई’ या मिठाई व्यवसायाचे मालक आणि व्यवसायिक वर्तुळात आदराने ओळखले जाणारे योगेंद्र राजन हेळेकर (वय ३७) यांचे अल्पशा आजाराने कोल्हापूर येथे दुःखद निधन झाले.
स्वभावाने मनमिळावू, मेहनती असलेले योगेंद्र हेळेकर यांनी रत्नागिरीतील पारंपरिक मिठाई व्यवसायाला नवे रूप दिले होते. त्यांच्या व्यवसायिक दूरदृष्टीमुळे ‘हेळेकर मिठाई’ हे नाव आज घराघरात परिचित झाले आहे. त्यांच्या अकाली जाण्याने व्यापार क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.