
लांजा तालुक्यातील वनगुळेत तब्बल चार बिबटे रस्त्यावर वावरताना सीसीटीव्हीत कैद.
लांजा तालुक्यातील वनगुळे गावातील एका घरासमोरील रस्त्यांवर एक नव्हे तर तब्बल चार बिबटे वावरताना दिसून आले आहेत. ३० जून रोजी मध्यरात्री १२ वाजता एक ग्रामस्थाच्या घराबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्यामध्ये रस्त्यावर चार बिबटे वावरताना कैद झाले आहेत.गेल्या काही दिवसांपासून लांजा शहरासह तालुक्यात बिबट्यांचा वावर वाढल्याच्या घटना समोर येत असून बिबट्याकडून पाळीव जनावरांवर हल्ल्याचे प्रमाणही वाढले आहे.अशातच २१ जून रोजी लांजा शहरातील बौद्धवाडीतील गोठ्यात शिरून पाडीवर हल्ला केल्याच्या घटनेत पाढी मृत्यूमुखी पडली होती. तालुक्यातील ग्रामीण भागात विविध गावांमध्ये सतत बिबट्याचा वावर आढळून येतो. वारंवार दिसणार्या बिबट्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.www.konkantoday.com