
रत्नागिरी शहरानजिकच्या मिर्या धूपप्रतिबंधक बंधार्याचे टेट्रॉपॉड लाटांमुळे सरकले.
रत्नागिरी शहरानजिकच्या मिर्या धूपप्रतिबंधक बंधारा १९० कोटी खर्चून उभारण्यात येत आहे. मिर्या बंधार्याच्या अपूर्ण राहिलेल्या १२०० मीटरच्या पांढरा समुद्र ते जयहिंद चौकापर्यंतचा कामाचा टप्पा शिल्लक आहे. मात्र त्यापुढील झालेल्या कामाच्या टप्प्यातील भाटकरवाडा परिसरातील बंधार्याच्या पायाचे दगड समुद्राच्या उधाणाने सरकले आहेत. त्यामुळे त्या दगडांवर उभारलेले टेट्रापॉड देखील खाली सरकले आहेत.मिर्या धूपप्रतिबंधक बंधार्याचे काम अजूनही पूर्णत्वास गेलेले नाही. जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी रत्नागिरी दौर्यावर असताना पांढरा समुद्र मिर्या धुपप्रतिबंधक बंधार्याची पाहणी करून सुरू असलेल्या कामांची माहिती घेतली. संबंधित अधिकार्यांना या बंधार्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. बंधार्याच्या अपूर्ण राहिलेल्या १२०० मीटरच्या पांढरा समुद्र ते जयहिंद चौकापर्यंतचा कामाचा टप्पा शिल्लक आहे. पत्तन विभागाने काही दिवसांपूर्वी ठेकेदाराची बैठक घेतली. लवकरात लवकर उर्वरित टप्प्याचे आणि बंधार्याच्या टॉपचे काम सुरू करण्याच्या सूचना ठेकेदार कंपनीला दिल्या होत्या.www.konkantoday.com