
आगामी गणेशाेत्सवाच्या पार्श्वभूमीवर काेकण रेल्वेने जादा गाडया सुरू करण्याची शाैकत मुकादम यांची मागणी.
काेकणातील चाकरमान्यांचा महत्वाचा सण असलेल्या गणेशाेत्सवाचे आता वेध लागले असून या काळात प्रवाशांची काेकण रेल्वेच्या गाड्यांना माेठी गर्दी हाेत असते. प्रवाशांना सुरक्षित आणि साेयीस्कर प्रवासासाठी काेकण रेल्वेने जादा गाड्या सुरु कराव्यात, अशी जाेरदार मागणी काेकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शाैकत मुकादम यांनी केली आहे.सध्या मुंबई-गाेवा राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था झालेली असून रस्त्यांवर माेठमाेठे खड्डे पडले आहेत. अशा परिस्थितीत रस्त्याने प्रवास करणे धाेकादायक झाले आहे. दुसरीकडे, काेकण रेल्वेच्या दैनंदिन नियमित गाड्यांचे आरक्षण पूर्णतः भरलेले असून नव्या प्रवाशांना आरक्षण मिळवणे कठीण झाले आहे.गणपती हा काेकणातील सर्वात माेठा सण असून या काळात मुंबईसह विविध शहरांमध्ये राहणारे लाखाे चाकरमानी आपल्या गावी येतात. मात्र सध्या रेल्वे व रस्ते प्रवास या दाेन्ही मार्गांची स्थिती चिंताजनक आहे. त्यामुळे चाकरमानींच्या हालाला वाचा ाेडण्यासाठी काेकण रेल्वेने अतिरिक्त गाड्या सुरु कराव्यात, असे मुकादम यांनी स्पष्ट केले.www.konkantoday.com