तत्काळ तिकीट बुकिंगसाठी आधार प्रमाणीकरण अनिवार्य, १ जुलैपासून अंमलबजावणी.

भारतीय रेल्वे प्रशासनाने सामान्य प्रवाशांना तत्काळ तिकीट सेवा अधिक सुलभ, पारदर्शक आणि सुरक्षित करण्याच्या दृष्टीने तत्काळ तिकीट बुकिंगसाठी आधार प्रमाणीकरण अनिवार्य करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. १ जुलैपासून निर्णयाची प्रत्यक्षात अंमलबजावणी केली जाणार आहे.आयआरसीटीच्या अधिकृत संकेतस्थळ किंवा मोबाईल ऍपवरून तत्काळ तिकीट बुक करताना आधार प्रमाणीकरण अनिवार्य असणार आहे. म्हणजेच प्रवाशांना तिकीट बुक करताना त्यांचा आधार क्रमांक आणि संबंधित तपशील द्यावा लागणार आहे. याशिवाय १५ जुलैपासून ओटीपी प्रमाणीकरणाची अट देखील लागू करण्यात येणार आहे. तत्काळ तिकीट बुकिंगसाठी आधार आधारित वन टाईम पासवर्ड प्रमाणीकरण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ओटीपी प्रवाशांच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर पाठवले जाईल. ते प्रमाणीकरण झाल्यानंतरच बुकिंग प्रक्रिया पूर्ण होणार आहे. ही अट रेल्वे पीआरएस काऊंटर आणि अधिकृत एजंटद्वारे होणार्‍या बुकिंगसाठी लागू असणार आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button