सोमवार दि.२३ जून रोजी अविनाश धर्माधिकारी यांचे ऑपरेशन सिंदूर पूर्वपीठिका आणि उत्तरदायित्व या विषयावर रत्नागिरीत व्याख्यान


चतुरंग प्रतिष्ठान व रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दि.२३ जून रोजी सायंकाळी ६.१५ वाजता स्वा.सावरकर नाट्यगृह, रत्नागिरी येथे मा.अविनाश धर्माधिकारी यांचे “ऑपरेशन सिंदूर पूर्वपीठिका आणि उत्तरदायित्व या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे. निवृत्त सनदी अधिकारी आणि प्रख्यात अभ्यासू, व्याख्याते म्हणून प्रसिद्ध असलेल्या अविनाश धर्माधिकारी यांचे व्याख्यानाचा योग अनेक महिन्यांनी जुळून आला आहे.
“ऑपरेशन सिंदूर” आणि परिस्थिती यामुळे प्रत्येक भारतीय नागरिक सचेत झाला आहे. या पार्श्वभूमीवर धर्माधिकारी यांचे व्याख्यान रत्नागिरी मध्ये होत आहे. या व्याख्यानाच्या कार्यक्रमाचा लाभ रत्नागिरीकरांनी घ्यावा. प्रामुख्याने युवावर्गाने आवर्जून या व्याख्यानाला उपस्थित रहावे असे विनम्र आवाहन चतुरंग प्रतिष्ठान आणि रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाचे वतीने करीत आहोत.
व्याख्यानासाठी स्वा.सावरकर नाट्यगृहात ठिक वेळेवर उपस्थित राहून नेटक्या नियोजनाला संधी द्यावी असे आवाहन करीत आहोत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button