
कोंबड्याच्या खुराड्यात शिरलेल्या बिबट्याला वनविभागाने केले जेरबंद
संगमेश्वर तालुक्यातील मौजे पुर्ये तर्फे सावर्डे येथील कृष्णा विठ्ठल पाडावे यांचे मालकीच्या कोंबड्यांसाठी केलेल्या बंदिस्त खोलीमध्ये भक्ष्याच्या शोधात आलेल्या बिबट्याला वनविभागाने जेरबंद केले.मौजे पुर्ये तर्फे सावर्डे येथील कृष्णा विठ्ठल पाडावे यांचे मालकीच्या कोंबड्यासाठी केलेल्या बंदिस्त खोलीमध्ये भक्ष्याच्या शोधात बिबट्या अडकला असल्याचे पोलीस पाटील नयन दळवी यांनी वनपाल संगमेश्वर यांना पहाटे कळवले.त्यानुसार वनपाल यांनी परिक्षेत्र वनअधिकारी रत्नागिरी यांना कळवून रेस्क्यू टीम सह घटनास्थळी दाखल होवून पाहणी केली. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी नियोजन करून पिंजरा देवरूखवरून ९ वाजता घटनास्थळी आल्यानंतर नियोजन केल्याप्रमाणे सदर बंदिस्त खोलीत खिडकीस पिंजरा लावून बंद केला. सदर जेरबंद बिबट्या देवरूख येथे आणून पशुधन विकास अधिकारी देवरूख, डॉ. आनंदराव कदम यांचे मार्फत अमृता साबळे तहसीलदार संगमेश्वर (देवरूख) यांचे समक्ष जेरबंद बिबट्याची तपासणी केली. तपासणीमध्ये तो नर जातीचा असून अंदाजे वय ५ वर्षे आहे.विभागीय वनअधिकारी रत्नागिरी (चिपळूण) दीपक खाडे, सहाय्यक वनसंरक्षक चिपळूण, वैभव बोराटे, परिक्षेत्र वन अधिकारी प्रकाश सुतार, मानद वन्यजीव रक्षक निलेश बापट यांचे मार्गदर्शनाखाली बिबट्यास मुक्त केले.www.konkantoday.com