
रेशन दुकानदारांना थकित कमिशन देणार, मंत्री छगन भुजबळ यांचे आश्वासन.
रेशन दुकानदारांचे थकित कमिशन येत्या ८ दिवसात दिले जाईल असे आश्वासन अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ बांनी मंगळवारी झालेल्या ऑनलाईन बैठकीत दिले. आमदार शेखर निकम यांच्या पुढाकाराने ही बैठक झाली. अन्य मागण्यांसाठी लवकरच प्रत्यक्ष बैठक होणार असल्याची माहिती रत्नागिरी जिल्हा रेशनिंग व केरोसीन चालक मालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक कदम यांनी दिली.कदम म्हणाले, गावागावात अनेक समस्यांचा सामना करीत रेशन दुकानदार शिधापत्रिकाधारकांना धान्य वाटण्याचे काम प्रामाणिकपणे करीत आहेत, असे असताना याच दुकानदारांना त्यांचे कष्टाचे कमिशन वेळेत मिळत नाही. त्यामुळे अनेक दुकानदारांवर उपासमारीची वेळ येत आहे. हा प्रकार संघटनेच्या माध्यमातून आमदार शेखर निकम यांच्यासह लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचवण्यात आला होता. त्यानुसार मंत्री छगन भुजबळ यांच्यासमवेत ऑनलाईन बैठक झाली.www.konkantoday.com