
कॉंग्रेस जिल्हाध्यक्षपदासाठी टी. डी. पवारना पाठिंबा, निरिक्षकांनी साधला कार्यकर्त्यांशी संवाद.
चिपळूण कॉंग्रेसचे महाराष्ट्र सचिव आणि रत्नागिरी, सिंधुदुर्गचे निरीक्षक शशांक बावचकर यांनी तालुका पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी साधलेल्या संवादामधून जिल्हाध्यक्षपदासाठी टी. डी. पवार यांच्या नावाला पाठिंबा देण्यात आला. रविवारी चिपळूण कॉंग्रेस कार्यालयात. बावचकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कॉंग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या – बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बूथ, जिल्हा परिषद, विभाग व तालुकास्तरावर बांधणी होणे गरजेची आहे. जिल्ह्यात सर्व कॉंग्रेस पदाधिकारी, कार्यकते एकत्रित झाल्यास निश्चितपणे कॉंग्रेसचा पुन्हा झंझावात निर्माण होईल. त्यामुळे संघटन बांधणी करून पुन्हा कॉंग्रेसला बळकटी देऊया, असे आवाहन कॉंग्रेसचे महाराष्ट्र सचिव आणि रत्नागिरी, सिंधुदुर्गचे निरीक्षक शशांक बावचकर यांनी व्यक्त केले.www.konkantoday.com