
रत्नागिरी, मुंबईतील कलाकारांची शास्त्रीय संगीत मैफल स्वराभिषेक (रत्नागिरी) व कलांगण (मुंबई) तर्फे ३० जून रोजी आयोजन.
रत्नागिरी : कलांगण (मुंबई) आणि स्वराभिषेक (रत्नागिरी) या संगीत संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वरस्नेह’ ही शास्त्रीय संगीत मैफल येत्या सोमवारी (ता. ३०) रत्नागिरीत होणार असून यामध्ये रत्नागिरी आणि मुंबईतील कलाकार गायन सादर करणार आहेत.मुलांमध्ये शास्त्रीय संगीताची आवड निर्माण व्हावी आणि रत्नागिरी आणि मुंबईतील कलाकारांना एकत्रित व्यासपीठ मिळावे याकरिता प्रसिद्ध संगीतकार वर्षा भावे आणि स्वराभिषेकच्या संचालिका विनया परब यांच्या संकल्पनेतून स्वरस्नेह हा उपक्रम राबवला जातो. स्वराभिषेक आणि कलांगणचे शिष्यवर्ग रत्नागिरीसह मुंबईत दर तीन महिन्यांनी ही मैफल सादर करतात. येत्या सोमवारी थिबा पॅलेजजवळील परमपूज्य गगनगिरी महाराज आश्रमाच्या रंगमंचावर सायंकाळी साडेसहा वाजता मैफल होईल. यामध्ये कलांगणचे वेदांथ धामणगावकर, स्मयन आंबेकर, वेदांत यादव, तर स्वराभिषेकचे आदित्य लिमये आणि ऐश्वर्या सावंत या शिष्यांचे गायन होईल.कार्यक्रमाचे निवेदन मनाली नाईक करणार असून ध्वनिसंयोजन राकेश बेर्डे करणार आहेत. या मैफलीसाठी आश्रमाचे व्यवस्थापक राम पानगले आणि श्री गगनगिरी महाराज भक्त मंडळाचे विशेष सहकार्य लाभले आहे. रसिकांसाठी ही मैफल विनामूल्य आहे. मैफलीला संगीतप्रेमींनी मोट्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन स्वराभिषेक आणि कलांगणतर्फे करण्यात आले आहे.——–photo- ऐश्वर्या सावंत, आदित्य लिमये, वेदांथ धामणगावकर, स्मयन आंबेकर, वेदांत यादव