सुट्टीची मजा संपली, आज सोमवारपासून शाळा सुरू, शाळेच्या पहिल्या दिवशी नवागतांचा प्रवेशोत्सव आनंदाने साजरा करण्याची सूचना


मुलांच्या दृष्टीने आवडीची असलेली उन्हाळी सुट्टी आता संपली पासून आज पासून शैक्षणिक कामाला सुरुवात होणार आहेत्यामुळे जिल्ह्यात सर्व शाळा आज सोमवारी गजबजून जाणार आहेत. जिल्ह्यात १०,१२१ नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात येणार आहे.
शाळेच्या पहिल्या दिवशी नवागतांचा प्रवेशोत्सव आनंदाने साजरा करण्याची सूचना शासनाकडून करण्यात आली आहे. त्यानुसार शालेय इमारतींची दुरुस्ती, साफसफाई, रंगरंगोटी करून शालेय परिसराची सजावटही करण्यात आली आहे. त्यासाठी शनिवारी, रविवारी शिक्षक शाळेत तयारीच्या कामात व्यस्त होते. नवागतांच्या स्वागतानिमित्त स्वागत फेरी काढण्यात येणार आहे. शाळेच्या प्रवेशद्वारात मुलांचे पारंपरिक पद्धतीने औक्षण करून, फूल देऊन व तोंड गोड करून स्वागत केले जाणार आहे
समग्र शिक्षा अभियानांतर्गत जिल्हा परिषद तसेच अनुदानित शाळेतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकांचे वितरण करण्यात येते. जिल्ह्यातील १ लाख २७९ विद्यार्थ्यांना ६ लाख १३ हजार ३८९ पुस्तकांचे वितरण करण्यात येणार आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके दिली जाणार आहेत.
समग्र शिक्षा अभियानांतर्गत जिल्हा परिषद व अनुदानित शाळेतील सर्व मुली, अनुसूचित जाती, जमाती व आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शासनातर्फे गणवेश वितरण करण्यात येतो. जिल्ह्यातील एकूण ६४,०२० विद्यार्थ्यांना प्रत्येक दोन गणवेश दिले जाणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button