महर्षी कर्वे स्त्री शिक्षणसंस्थेच्या बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटने प्रवास, पर्यटन आणि आदरातिथ्य हा नवा अभ्यासक्रम सुरू.

गेल्या काही वर्षांत कोकण हे राज्यातील एक महत्त्वाचे पर्यटनकेंद्र बनले आहे.पर्यटनक्षेत्रात कुशल मनुष्यबळाची मोठी गरज निर्माण झाली आहे. विशेषतः महिलांसाठी या क्षेत्रात भरपूर रोजगार व उद्योजकतेच्या संधी उपलब्ध होत आहेत, याकरिताच महर्षी कर्वे स्त्री शिक्षणसंस्थेच्या बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटने प्रवास, पर्यटन आणि आदरातिथ्य हा नवा अभ्यासक्रम सुरू केला आहे.महिलांमध्ये आतिथ्याची परंपरा, स्वयंपाकातील कौशल्य, भाषेची जाण आणि सृजनशीलता ही पर्यटनक्षेत्रासाठी अतिशय उपयुक्त ठरते. योग्य प्रशिक्षण दिल्यास या महिला आत्मनिर्भर बनतील आणि कोकणातील पर्यटनाला स्थानिक चेहरा मिळेल.

एक वर्षाचा सर्टिफिकेट डिप्लोमा कोर्स आहे. हा अभ्यासक्रम फक्त १२वी उत्तीर्ण विद्यार्थिनींसाठी आहे. अभ्यासक्रम जुलैपासून सुरू करण्यात येणार आहे. हा अभ्यासक्रम अर्धवेळ स्वरूपाचा असेल. पदवी शिक्षण घेतानासुद्धा हा अभ्यासक्रम पूर्ण करता येणार आहे.कोकणात मोठ्या प्रमाणावर हॉटेल्स, रिसॉर्ट्स, होम स्टे, पर्यटन संस्था, मार्गदर्शक, फूडस्टॉल्स आणि पर्यटक सेवाकेंद्रे सुरू होत आहेत. या सर्व ठिकाणी प्रशिक्षण घेतलेल्या महिलांना नोकरीच्या संधी सहज मिळू शकतात. अभ्यासक्रमात तज्ज्ञांचे मार्गदर्शन, क्षेत्रभेटी, प्रात्यक्षिके, इंटर्नशिपचा समावेश आहे. नोकरी व स्वरोजगारासाठी साहाय्य करण्यात येईल. तसेच बाहेरगावच्या विद्यार्थिनींसाठी संस्था परिसरात विद्यार्थिनी वसतिगृह व खाणावळ सुविधा उपलब्ध आहे. अधिक माहितीकरिता इच्छुकांनी बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, नलावडे कॉम्प्लेस, मारुती मंदिर, रत्नागिरी येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button