देवरुखच्या डी-कॅडमधील दोघांच्या चित्रांची जहांगीर आर्ट गॅलरीतील प्रदर्शनासाठी निवड.

मुंबई येथील प्रसिद्ध आर्ट गॅलरी दरवर्षी मान्सून प्रदर्शनाचे आयोजन करत असतात. यावर्षी जहांगीर आर्ट गॅलरीतील या मान्सून प्रदर्शनामध्ये संगमेश्वर तालुक्यातील देवरूख येथील डी-कॅड कला महाविद्यालयातील दोन विद्यार्थ्यांच्या चित्रांची निवड झाली आहे. प्रियांशू मीठागरी याचे जलरंगातील निसर्ग चित्र तर मानसी कुबडे हिच्या चित्राची निवड झाली आहे.मुंबई येथील प्रसिद्ध नेहरू आर्ट सेंटर येथे भव्य अशा चातक मान्सून प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. यामध्ये चित्रकलेतील विद्यार्थी, चित्रकार तसेच चित्रकलेचे शिक्षक यांच्या चित्रांचा समावेश असतो. चातक पक्षी जसा पावसाच्या पहिल्या थेंबांची वाट पाहतो. त्याप्रमाणे विद्यार्थी, शिक्षक, चित्रकार या नेहरू सेंटरच्या चातक मान्सून प्रदर्शनाची वाट पाहात आहेत.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button