दारूच्या नशेत सिव्हिल सर्जनची कॉलर पकडणार्‍या तरूणाला अटक

रत्नागिरी ः मध्यरात्री जिल्हा रूग्णालयात तपासण्यासाठी आलेले सिव्हिल सर्जन डॉ. अशोक बोल्डे यांची कॉलर पकडून त्यांना ढकलाबुकली करणार्‍या निलेश कुवळेकर (रा. चवंडेवठार) याला पोलिसांनी ताब्यात घेवून अटक केली. सदरचा तरूण दारूच्या नशेत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. येथील सिव्हिल सर्जन डॉ. अशोक बोल्डे हे रूग्ण कक्षाची तपासणी करत असताना त्या ठिकाणी आरोपी निलेश हा दारूच्या नशेत आपल्या नातेवाईकांना घेवून जिल्हा रूग्णालयात आला होता. तो महिलांच्या वॉर्डमध्ये आल्याने डॉ. बोल्डेनी त्यांना बाहेर जाण्यास सांगितले. त्याचा राग येवून त्याने आरडाओरड करत डॉ. अशोक बोल्डे यांच्याशी झटापट करून धक्काबुक्की केली. याबाबत सिव्हिल सर्जन यांनी पोलीस स्थानकात तक्रार केल्यावर शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी निलेश याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. व त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली

Related Articles

Back to top button