इम्रान खान यांना मोठा धक्का! १० वर्षाच्या तुरूंगवासाची शिक्षा*

  • पाकिस्तानमधील पीटीआय पक्षाचे संस्थापक, माजी पंतप्रधान इम्रान खान आणि माजी परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांना मंगळवारी सायफर प्रकरणात 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली, अशी माहिती पाकिस्तानातील स्थानिक माध्यमांनी दिली आहे.पाकिस्तानी दैनिक ‘डॉन’ने सांगितले की, सत्तेत असताना राजकीय हेतूने गोपनीय डिप्लोमॅटिक केबलचा (सायफर) गैरवापर केल्याचा आरोप इम्रान खान यांच्‍यावर ठेवण्‍यात आला होता. यानुसार ऑफिशियल सिक्रेट्स ॲक्ट अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या विशेष न्यायालयाने त्यांना ही शिक्षा सुनावली आहे. पाकिस्तानमध्ये ८ फेब्रुवारीला गुरुवारी मतदान होत आहे, यापूर्वी इम्रान खान यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button