
राजापूर तालुक्यातील साखरीनाटे येथील घेरा यशवंतगडाची जिल्हाधिकारी करणार पाहणी.
राजापूर तालुक्यातील साखरीनाटे येथील ऐतिहासिक घेरा यशवंतगडाच्या दुरुस्तीचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. या कामाची पडझड होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या कामाची चौकशी करावी आणि संबंधित ठेकेदाराचा ठेका तत्काळ रद्द करण्यात यावा, अशी मागणी राजापूरच्या कॉंग्रेस नेत्या व माजी आमदार हुस्नबानू खलिफे यांनी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली. दरम्यान यावेळी जिल्हाधिकारी यांनी घेरा यशवंतगडाच्या पडझड झालेल्या घटनास्थळी येऊन प्रत्यक्ष पाहाणी करणार असल्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती देण्यात आली. घेरा यशवंतगडाच्या दुरुस्तीचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. त्यामुळे हा किल्ला हा सद्यस्थितीमध्ये दुरुस्तीच्या कामामुळे पर्यटकांसाठी धोक्याचा ठरत आहे.www.konkantoday.com