
वणवा फळलागवड याेजनेला लागलेला शाप, वनपाल सुरेश उपरे
वणवा हा काेकणातील फळलागवड याेजनेला लागलेला शाप ठरत आहे ग्रामस्थांनी त्यासाठी जागृत राहिले पाहिजे. यावर वेळीच उपाय-याेजना केल्या तरच जंगले सुरक्षित राहतील, असे प्रतिपादन सावर्डेचें वनपाल सुरेश उपरे यांनी केले. नायशी येथे कृषी दिनानिमित्त आयाेजित कृषी मार्गदर्शन मेळाव्यात ते बाेलत हाेते. कृषी मेळाव्याचा शुभारंभ वनपाल उपरे यांच्यासह सरपंच संदीप घाग, अर्चना घाग, संताेष कदम, अरविंद घाग यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायतीच्यावतीने वनपाल उपरे, वनरक्षक संजीवनी जाधव, सामाजिक वनीकरणच्या समृद्धी आरखटे, अरुण जाधव, कृषी सहाय्यक आकाश चव्हाण, गावातील सामाजिक उपक्रमात सहभागी हाेणारे संताेष कदम, रवींद्र गुरव, ग्रामविकास अधिकारी वाय. बी. साेनवणे यांचा सत्कार करण्यात आला. नवनिर्वाचित सरपंच संदीप घाग यांना नायशी बाैद्धजन सेवा संघाच्यावतीने गाैरवण्यात आले. यावेळी पाचवेवाडी वाघेश्वरी केदारनाथ सहाण, जिल्हापरिषद शाळा व वागेश्वरी केदारनाथ ग्राम मंदीर येथे वृक्षाराेपण करण्यात आले.www.konkantoday.com