
वेटिंग तिकीट असल्यास स्टेशनवर प्रवेश मिळणार नाही; रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची संसदेत माहिती
केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी संसदेत रेल्वे स्थानकांवर गर्दीचे व्यवस्थापन सुधारण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलली असल्याची माहिती दिली आहे.यामध्ये रुंद फूट ओव्हरब्रिज, सीसीटीव्ही आणि वॉर रूमची व्यवस्था करण्यात आल्याचे अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीत 18 जणांचा मृत्यू झाला होता. यासारखी घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी आता महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
त्यानुसार, सण आणि यात्रांमध्ये होणारी प्रचंड गर्दी नियंत्रित करण्यासाठी रेल्वेने मर्यादित प्रवेश नियंत्रण प्रणाली लागू केली आहे. या प्रणालीनुसार स्थानकांच्या बाहेर होल्डिंग एरिया तयार केले गेले आहेत. त्याद्वारे ट्रेन प्लॅटफॉर्मवर येईपर्यंत प्रवाशांना प्रवेश दिला जाणार नाही, असंही अश्विनी वैष्णव म्हणाले.