
दुचाकी वरून जाणाऱ्या जोडप्यावर बिबट्याचा हल्ला महिला जखमी
राजापूर ओणी येथे आज सकाळी 9 वाजता भर दिवसा बिबट्याने दुचाकीवर हल्ला करून महिलेला जखमी केले. या घटनेने परिसरात भीती निर्माण झाली आहे.
, मनसूर अकबर मापारी (रा, ओझर) हे सकाळी 9 वाजता त्यांची पत्नी व मुलगा यांना दुचाकी वरुन राजापूर येथे घेऊन जात असताना मौजे तिवरे या ठिकाणी आले असता बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्यात दुचाकीवरून सारेच खाली पडले. त्यांची पत्नी श्रीम.अमिना मनसुर मापारी यांच्यावर बिबट्याने झडप घातली. त्यांनी आरडा ओरडा सुरू केला. मात्र अमिना यांच्या उजव्या पायात बिबट्याचे नख घुसले. त्या जखमी झाल्या. त्यांना तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र ओणी येथे उपचार दाखल करण्यात आले. त्यांची तब्येत स्थिर असल्याची माहिती वनविभागाने दिली आहे.