
मुंबई विद्यापीठाच्या आयडॉल विभागाचा हलगर्जीपणा, मुंबई विद्यापीठाकडून गुणपत्रिकेची प्रतीक्षा.
मुंबई विद्यापीठाच्या आयडॉल विभागाचा हलगर्जीपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. युजी आणि पीजीच्या विविध अभ्यासक्रमांच्या विविध वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका अजूनही रत्नागिरी येथील विद्यापीठाच्या उपपरिसरात पोहोचलेल्या नाहीत. यामुळे विद्याथ्याना पुढील शैक्षणिक आणि व्यावसायिक प्रक्रियांमध्ये अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे.अनेक अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया नोकरीसाठी अर्ज अथवा परदेशी शिक्षणासाठी दस्तऐवज सादर करताना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विद्यार्थ्यांनी विद्यापीठ उपपरिसर प्रशासनाकडे वारंवार चौकशी केली असता रत्नागिरी उप परिसर प्रशासनाने वारंवार पाठपुरावा केला असल्याचे दिसून आले. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी असून विद्यापीठाच्या आयडॉल विभाग वेळेवर सेवा देत नाही, असा आरोप विद्यार्थ्यांकडून केला जात आहे. मुंबई विद्यापीठ आयडॉल रत्नागिरी उप परिसराचे महत्व कमी करण्याचा हा डाव तर नव्हे ना? असा संशयही अनेकांकडून व्यक्त होताना दिसत आहे. गुणपत्रिका तातडीने उपपरिसरात पोहोचवाव्यात यासाठी विद्यापीठ प्रशासनाने तत्काळ पावले उचलावीत अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.www.konkantoday.com