रत्नागिरी कडे प्रवासी घेऊन येणाऱ्या मिनी बसला टँकरची धडक

मिनी बस दरीत कोसळली अनेक जण जखमी टँकर मधून वायू गळती

गोवा राष्ट्रीय महामार्गावर निवळी – बावनदी दरम्यान आज सकाळी एक भीषण अपघात झाला आहे रत्नागिरीकडे जाणारा एलपीजी गॅस टँकर (क्रमांक NH 01N 4628) आणि चिपळूणहून रत्नागिरीकडे येणारी मिनी बस यांच्यात जोरदार धडक झाली. या धडकेमुळे ही मिनीबस खाली दरीत कोसळली त्यामुळे अनेक प्रवासी जखमी झाल्याचे वृत्त आहे घटनास्थळी पोलीस व अग्निशामक दल दाखल झाला आहेअपघातानंतर टँकरमधून गॅसची गळती सुरू झाली होती. घटनास्थळी अग्निशमन दल आणि पोलीस दल तत्काळ दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे आणि बचावकार्य सुरू आहे.अनेक प्रवासी जखमी, दरीत कोसळली मिनी बसधडकेनंतर मिनी बसचा चालक नियंत्रण गमावल्यामुळे बस खोल दरीत कोसळल्याची माहिती मिळत आहे. या घटनेत अनेक प्रवासी जखमी झाले असून, रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी पोहोचल्या आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात हलवले जात आहे.या अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्ग दोन्ही बाजूंनी बंद करण्यात आला आहे. परिणामी, दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पोलीस विभागाने वाहतूक नियंत्रण व मदत कार्य सुरू केले आहे.गॅस गळतीमुळे भीतीचे वातावरणगॅस टँकरमधून सुरू असलेल्या गळतीमुळे स्थानिक नागरिक आणि प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने परिसर रिकामा करण्यात येत आहे या अपघातात मिनी बसमधील प्रवासी जखमी झाले असून त्यांना नजीकच्या रुग्णालयात हलविण्यात येत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button