
विभागाला बळकटी देण्यासाठी अन्न-औषधमध्ये १९० अधिकार्यांची भरती, मंत्री योगेश कदम.
राज्य शासनाचे आतापर्यंत अन्न व औषध प्रशासन विभाग हा दुर्लक्षित विभाग होता. पण या विभागाला बळकटी देत कारभार गतिमान करण्यासाठी १९० नवीन अन्न सुरक्षा अधिकार्यांची नियुक्ती केली जाणार आहे. तसेच कमी असलेली ड्रग्ज इन्स्पेक्टरची संख्या भरून काढण्याची मागणी वरिष्ठ विभागाकडे करण्यात आल्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
रत्नागिरीत रविवारी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने मंत्री कदम हे आले होते. त्यावेळी त्यांनी येथील शासकीय विश्रामगृहं. येथे पत्रकारांशी संवाद साधला. शासनाच्या अन्न व औषध प्रशासनाची पकड पदभरतीद्वारे नव्या अधिक मजबूत करण्याचा आमचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. अलिकडे ग्राहकांना विक्री केल्या जाणार्या दुधाची भेसळ रोखण्यासाठी कडक कारवाई केल्याचे मंत्री कदम यांनी सांगितले. त्यासाठी नवे तंत्रज्ञानाचा अवलंब केला जात आहे. या कारवाईसाठी जबाबदारी देण्यात आलेल्या अधिकार्यांमार्फत प्रत्यक्ष जागेवर जाऊन तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.www.konkantoday.com