
शृंगारतळीत अवैध उत्खनन, जेसीबीसह दोन ट्रॅक्टर ताब्यात.
विजापूर राष्ट्रीय महामार्गाच्या शेजारी शृंगारतळी येथे अवैध माती उत्खनन करणार्या जेसीबी व दोन ट्रॅक्टरना तलाठी सचिन शिंदे यांनी ताब्यात घेतले आहे. शृंगारतळी येथे रस्त्याच्या कडेला खुलेआम माती उत्खनन करणार्याला गुहागर तहसीलदारांनी दणका दिला. याप्रकरणी तहसीलदारांच्या आदेशानुसार जेसीबी व दोन ट्रॅक्टर तलाठी सचिन शिंदे यांनी जप्त केले आहेत तर उत्खननाची मुदत संपलेली असतानाही उत्खनन केल्याप्रकरणी अहमद केळकर यांच्या नावे पंचनामा केला. सोमवारी हा पंचनामा गुहागर महसूलमध्ये दाखल केला जाणार असून तहसीलदार यावर कोणती कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे.www.konkantoday.com