आता पिनकोड नाही तर ‘Digipin’ शेअर करा; भारतीय डाक विभागानं आणली पत्ता शोधणारी नवी प्रणाली.

तुम्ही पत्ता लिहिताना किंवा कुणाला तरी सांगताना पिनकोडचा उल्लेख केला असेल. परंतु पिनकोड कसं काम करते माहिती आहे का? हा पिनकोड ६ नंबरचा आकडा असतो जो भारतातील कुठल्याही क्षेत्राला डाक विभागाद्वारे दिलेली ओळख असते.प्रॅक्टिकलपणे एखादे कुरिअर अचूक पत्त्यावर पोहचत नाही ते पाहता भारतीय डाक विभागाने आता पत्ता शोधणारी नवीन प्रणाली जारी केली आहे. त्याला डिजिपिन नाव देण्यात आले आहे. याचा हेतून देशातील कुठलाही भाग किंवा कोपऱ्याचा पत्ता डिजिटलपणे मिळू शकतो.काय आहे Digipin?डिजिपिन हा नवीन पत्ता शोधणारी सिस्टम आहे. डाक विभागाने IIT हैदराबाद आणि ISRO सोबत मिळून ही प्रणाली विकसित केली आहे. त्याता हेतू भारतातील कुठल्याही ठिकाणाची अचूक ओळख डिजिटपणे करता येईल. त्याला आयडी मिळेल.

या संपूर्ण सिस्टम अंतर्गत देशाला ४ मीटर बाय ४ मीटर आकाराच्या छोट्या छोट्या भागात विभाजन केले आहे. प्रत्येक भागाला यूनिक आयडी देण्यात आला आहे. हा आयडी १० आकडी अक्षरांचा एक कोड असेल त्याला डिजिपिन म्हटलं जाते. हा कोड कुठल्याही जागेचा Latitude आणि Longitude वर आधारित असेल. या सिस्टिममुळे एखाद्या गल्लीबोळातील कुठलेही ठिकाणी सहज अचूक मिळू शकते. आता कुठल्याही कुरिअरवाल्याला किंवा व्यक्तीला एखादे पार्सल तुमच्यापर्यंत पोहचवण्यात अडथळा किंवा समस्या येणार नाही.पिनकोडपेक्षा Digipin वेगळे कसे?डिजिपिन आणि पिनकोड दोन्ही पत्ते ओळखण्यासाठी वापरले जात असले तरी त्यांची काम करण्याची पद्धत पूर्णपणे वेगळी आहे. पिनकोड हा ६ अंकी क्रमांक असतो जो खूप मोठ्या परिसराची ओळख पटवतो.

डिजिपिन ही एक डिजिटल लोकेशन सिस्टम आहे जी संपूर्ण भारतातील कोणत्याही ठिकाणाचे अचूक स्थान ओळखण्यास मदत करते. ज्याप्रमाणे पिन कोड ६ अंकी असतो, त्याचप्रमाणे डिजिपिन हा १० आकड्यांचा किंवा अक्षरांचा कोड असतो. या प्रणालीमध्ये संपूर्ण देश ४x४ मीटरच्या ग्रिडमध्ये विभागलेला असतो आणि त्यानंतर प्रत्येक भागाला १० अक्षरांचा कोड दिला जातो. एकूणच डिजिपिन अधिक अचूक स्थान देतो तर पिन कोड फक्त परिसराबद्दल माहिती देतो.तुमचा Digipin कसा ओळखाल?तुम्हाला तुमचा डिजिपिन हवा असेल तर या लिंकवर क्लिक करा..Digipin च्या अधिकृत वेबसाइटवर गेल्यानंतर तुम्ही तुमचा पूर्ण पत्ता किंवा जीपीएस लोकेशन तिथे नोंदवू शकता. त्यानंतर सिस्टम तुम्हाला तुमच्या लोकेशननुसार १०-अक्षरी युनिक कोड देईल. हा तुमच्या पत्त्याचा डिजिपिन असेल. हा कोड अचूक लोकेशन दर्शवितो. भविष्यात तुम्ही पोस्टल सेवा, ऑनलाइन डिलिव्हरी आणि सरकारी सुविधांसाठी देखील या डिजिपिनचा वापर करू शकता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button