रत्नागिरी विधानसभा मतदारसंघावरील हक्क सोडून नगराध्यक्षपदावर हक्क दाखवून भाजपाची शिवसेनेला गुगली

रत्नागिरी ः रत्नागिरी विधानसभेच्या जागेबाबत शिवसेनेला अनुकुलता दाखवत असतानाच रत्नागिरी नगर परिषदेच्या होणार्‍या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला हे पद द्यावे अशी मागणी करून भाजपाने शिवसेनेसमोर गुगली टाकली आहे. रत्नागिरी जिल्हा भाजपमध्ये मोठे फेरफार होवून भाजप जिल्हाध्यक्षपदी ऍड. दीपक पटवर्धन यांची निवड झाली. अध्यक्षपदाची सूत्रे हातात घेताच पटवर्धन यांनी जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार असल्याचे स्पष्ट केले. महाराष्ट्रात भाजप-सेनेची युती असून येणार्‍या विधानसभेत आम्ही युतीच्या धोरणानुसार गुहागरची जागा मागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाबाबत त्यांनी भाजपकडून कोणताही दावा केला नाही. मात्र आमची शिवसेनेबरोबर युती असल्याने रत्नागिरी नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेेने अडीच वर्षे नगराध्यक्षपद भुषविले असल्याने पुढील अडीच वर्षे भाजपला संधी दिली पाहिजे अशी मागणी आम्ही करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र अंतिम निर्णय पक्षाचे वरिष्ठ देतील असे सांगितले.
विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेला भाजपला बरोबर घेवूनच जाणे आवश्यक आहे. त्यामुळे भाजपने एकप्रकारे शिवसेनेला नगराध्यक्षपदाची ऑफर देवून गुगली टाकली आहे. त्याला शिवसेनेकडून कसा प्रतिसाद दिला जाईल हे लवकरच स्पष्ट होईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button