
भाजपकडून रवींद्र चव्हाण यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली जाणार.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. लोकसभा निवडणुका पार पडल्यापासनूच भाजपने संघटनात्मक निवडणुकीवर भर दिला आहे.राज्यात ‘संघटन पर्व’ मोहीम राबवण्यात आली. ज्यामुळे पक्षाचे गटस्तरावरील बळ वाढले आहे.महाराष्ट्र राज्याला दीड कोटी नव्या सदस्य नोंदणीचे टार्गेट देण्यात आले होते. हे टार्गेट पूर्ण करण्यात आले आहे. त्यानंतर बूथ कमिटी, मंडलअध्यक्ष, शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष अशा निवडी आतापर्यंत पार पडल्या आहेत. त्यामुळे आता जून महिन्यातच भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्षाची घोषणा केली जाणार आहे तर दुसरीकडे मुंबई अध्यक्षपदासाठी तीन नावे चर्चेत असून त्यापैकी एका नावाची घोषणा करण्यात येणार आहे.राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची राज्य मंत्रिमंडळात वर्णी लागली. त्यांच्याकडे महसूलमंत्री पदाचा पदभार सोपविण्यात आला आहे. त्यांचा प्रदेशाध्यक्ष पदाचा कार्यकाळ संपत आल्याने त्यांच्या जागी भाजपकडून रवींद्र चव्हाण यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली जाणार आहे. त्याची अधिकृत घोषणा जून महिन्यात केली जाणार आहे. त्यांच्याकडे निवडी पूर्वीच राज्यातील ‘संघटन पर्व’ मोहीमची प्रमुख जबाबदारी सोपविण्यात आली होती. चव्हाण यांनी ही जबाबदारी पार पाडली.आमदार रवींद्र चव्हाण यांनी आतापर्यंत डोंबिवलीचे चार वेळा प्रतिनिधीत्त्व केला आहे. तर यापूर्वी सार्वजनिक बांधकाम, अन्न व नागरी पुरवठा, आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांची जबाबदारी सांभाळली आहे. त्यामुळे त्यांच्याकडे येत्या काळात महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. सध्या ते भाजपचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष आहेत. आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पाहता चव्हाण यांच्या नावाची लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याचे समजते.