मुसळधार पावसाला “ब्रेक” लागणार..!

मे महिन्यातच धडकलेल्या मोसमी पावसाबाबत बाबत तज्ज्ञाकडून शंका वर्तवली जात असताना राज्यात मात्र पावसाला “ब्रेक” लागणार आहे. मे महिन्यात केरळमध्ये मोसमी पाऊस धडकला आणि त्यानंतर राज्यातही मुंबई, पुण्यात तसेच मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात मोसमी पावसाची घोषणा करण्यात आली. प्रत्यक्षात हवामान खात्याने मोसमी पाऊस घोषित केला असला तरी या पावसाचे कोणतेही निकष पूर्ण झाले नव्हते. याउलट हा पाऊस वादळी व गडगडाटी असल्याने तज्ज्ञानी तो पूर्वमोसमी पाऊस असल्याचे सांगितले. या पावसावरून हवामान खाते आणि हवामान शास्त्रज्ञामध्ये दावेप्रतिदावे सुरू असतानाच आता पावसाला राज्यात “ब्रेक” लागणार आहे. राज्यात अनेक ठिकाणी पावसाने जोर पकडला. हा पाऊस पाठ सोडणार की नाही असे वाटत असतांनाच पावसाने आता उसंत घेतली आहे. अनेक ठिकाणी पावसाचा जोर कमी झाल्याचे दिसून आले आहे.

*हवामान खात्याच्या माहितीनुसार दक्षिण कोकणातील जिल्ह्यांसह दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या घाट क्षेत्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर, उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यादरम्यान सोसाट्याचा वारा वाहणार असून, वाऱ्याचा वेग ताशी ४० ते ५० किलोमीटर इतका असेल. मराठवाडा आणि विदर्भामध्ये सध्या पर्जन्यमान अधिक राहणार असून, विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

यादरम्यान वाऱ्याचा वेग ताशी ५० ते ६० किलोमीटर इतका असेल. मुंबई आणि कोकणात तापमानात काही अंशांनी वाढ अपेक्षित आहे. मोसमी पाऊस या भागांमध्ये काही दिवस साधारण बरसताना दिसेल. त्यामुळे असह्य उकाडा असणार आहे.*देशाची स्थिती काय?*सध्या दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असून तामिळनाडूच्या निलगिरी जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. या मुसळधार पावसामुळे अनेक घरांना भेगा पडल्या असून अनेक सखल भागात पाणी साचले आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झालेय. तर, अतीव उत्तरेकडे जम्मू काश्मीरच्या कुपवाडामध्ये मुसळधार पाऊस बरसला असून अनेक ठिकाणी तुफान गारपीटही झाली आहे. तर, हिमाचलच्या काही भागांमध्येही पावसाने हजेरी लावली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button