
शहराप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यातील सहा तालुक्यात आता कॉंक्रिटचे रस्ते
रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण रस्त्यांची दुरवस्था हा जुना प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत आता ग्रामीण रस्ते डांबरीकरणाऐवजी कॉंक्रिटचे होणार आहेत. त्यामुळे रत्नागिरीच्या दुर्गम भागातील प्रवासाला अधिक सुरक्षित आणि टिकाऊ पर्याय मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात, जिल्ह्यातील सहा तालुक्यांमधील १२०.५४ किलोमीटर लांबीच्या ३९ महत्त्वाच्या रस्त्यांच्या दर्जोन्नतीसाठी तब्बल १९० कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.या नव्या योजनेचा लाभ मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, संगमेश्वर आणि रत्नागिरी या सहा तालुक्यांना मिळणार आहे. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या धर्तीवर, महाराष्ट्रातील ज्या वाड्या-वस्त्यांना अद्याप योग्य रस्ते जोडणी मिळालेली नाही आणि ज्यांची लोकसंख्या किमान एक हजार आहे त्यांना जोडण्यासाठी तसेच सध्या दुरवस्था झालेल्या रस्त्यांची दर्जोन्नती करण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा-२ राबविण्यात येणार आहे.www.konkantoday.com




