
राजापूर टपाल कार्यालयात पासर्पोर्टची सुविधा उपलब्ध झाल्याने सहा वर्षामध्ये ३८ हजार जणांनी काढले पासपोर्ट.
राजापूर टपाल कार्यालयात गेल्या ६ वर्षाच्या कालावधीमध्ये ३८ हजार ५०० हून अधिक लोकांनी पासपोर्ट काढला आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या राजापुरातील हे पासपोर्ट कार्यालय दोन्ही जिल्ह्यांसाठी सोयीचे ठरत आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हयात कोठेही पासपोर्ट सेवा कार्यालय नसल्याने पासपोर्टसाठी अर्ज केल्यानंतर कागदपत्रांची पडताळणीसाठी मुंबई येथे जावे लागत होते.
मुंबई येथे कागदपत्र पडताळणीमध्ये काही त्रुटी राहिल्यास संबंधित अर्जदाराची फेरी फुकट जात असे. तसेच हज यात्रेसाठी जाणार्या वयोवृद्धांना मुंबईला फेर्या मारणे त्रासाचे ठरत होते. त्यामुळे कोकणात पासपोर्ट सेवा केंद्र सुरू होणे अत्यंत निकडीचे होते आणि तशी मागणीही होत होती. ही मागणी पूर्ण झाली.www.konkantoday.com