कशेडी घाटातील खुनाचा उलगडा; बोरसूत येथील आरोपीसह दोघांना अटक.

खेडतालुक्यातील कशेडी घाटरस्त्यांलगत मृतदेह टाकून फरार होण्याच्या घटनांना चाप बसेल असे तपासकार्य करून पोलादपूर पोलीसांनी 30 एप्रिल रोजी आढळलेल्या बेवारस अज्ञात व्यक्तीच्या प्रेताबाबत शोध घेताना एका महिलेसह तीन आरोपी गजाआड केले यामुळे दोन आरोपींचा कर्नाटक सीमावर्ती भागात गेले दोन महिने चाललेला लपाछपीचा आणि पोलीसांना गुंगारा देण्याचा खेळ संपुष्टात आलापोलादपूर पोलीस ठाण्याच्याहद्दीत 30 एप्रिल 2025 रोजी जुन्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील दरीभागात एका अज्ञात इसमाचे साधारणत: तीन दिवस कुजलेले प्रेत काँक्रीटच्या संरक्षक भिंतीपलीकडे आढळून आले.

या घटनेची खबर भोगावच्या पोलीस पाटील शुभांगी राकेश उतेकर यांनी 30 एप्रिल 2025 रोजी दिल्यानुसार सहायक पोलीस निरिक्षक आनंद रावडे, पोलीस हवालदार आर.के.सर्णेकर, संग्राम बामणे, तुषार सुतार, सौरव जाधव यांनी घटनास्थळी पंचनामा केला. प्रेताला भर उन्हात दोनतीन दिवस कुजल्याने परिसरात दूर्गंधी पसरली होती. या घटनेनंतर पोलादपूर पोलिसांनी तांत्रिक व मानवी गुप्त माहितीच्या आधारे मृतदेहाची ओळख पटवत तातडीने तपास करताना केवळ चारच दिवसांनी अक्षय जाधव या तरूणाला पोलादपूर पोलीसांनी तपासाअंती ताब्यात घेतले. अक्षय जाधव याच्याकडून प्राप्त माहितीनुसार मयत व्यक्तीचे नांव सुनील दादा हसे,(वय-54,रा.अंबड, ता-अकोले, जि.-अहिल्यानगर) असे होते.यावेळी पुढील तपासामध्ये या खुनामध्ये मुख्य दोन आरोपींचा सहभाग उघडकीस आला. सुनील हसे हा वॉक्सवॅगन कार (क्रमांक एमएच15 डीएस 8005) ही भाडयाने देणे आणि स्वत: वाहन चालवून उपजिविका साधणे असा व्यवसाय रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील सती या गावात राहून करीत असे. त्याची वंदना दादासाहेब पुणेकर (वय 36, रा.लेन, जयसिंगपूर, ता.कोल्हापूर) हिच्यासोबत गाडीने लिफ्ट देण्याच्या निमित्ताने ओळख झाली. वंदना पुणेकर हिला सुनील दादा हसे हा श्रीमंत आणि सधन वाटल्याने तिने त्याला जाळयात ओढले.

मात्र, त्याच्याकडे फारसे आढळून न आल्याने तिने अक्षय जाधवसोबत त्याला संपविण्याचा घाट घातला. यामुळे तिने तिचा नवरा मोहन पांडुरंग सोनार,(वय-54, रा-बोरसूत, ता-संगमेश्वर, जि-रत्नागिरी) याची मदत घेतली. मोहनच्या मदतीने वंदना पुणेकर हिने सुनील दादा हसे याच्या गाडीमध्ये मागील सीटवर बसून सुनील हसे याला दि.27 एप्रिल 2025 रोजी पहाटेच्या सुमारास कसलेसे गुंगीचे औषध पाजले आणि त्याला कराड चिपळूणमार्गे पोलादपूरच्या दिशेने आणताना गाडीतच ओढणीने मागील सीटवरून गळा आवळून ठार मारले आणि पोलादपूर तालुक्यातील कशेडी घाटातील जुन्या महामार्गालगत काँक्रीटच्या संरक्षक कठडयालगत दरीमध्ये टाकले. यानंतर हे दोघे आरोपी गेल्या दोन महिन्यांपासून फरार होते आणि आपली ओळख लपवत कर्नाटकमधील सीमाभागात लपून राहत होते.याबाबत रायगड पोलीस अधीक्षक आंचल दलाल आणि रायगड अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे यांच्यो मार्गदर्शनखाली आणि महाड उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे यांच्या नेतृत्वाने पोलादपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरिक्षक आनंद रावडे यांच्यासमवेत पथकातील पो.हवा.तुषार सुतार, पो.ना. अनुजित शिंदे, महिला पोलीस शिपाई बनसोडे यांनी या दोन्ही प्रमुख आरोपींना महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांच्या सीमावर्ती भागातून आरोपी वंदना दादासाहेब पुणेकर आणि मोहन पांडुरंग सोनार या दोघांना पोलादपूर पोलिसांच्या अथक प्रयत्नांमुळे व मानवी गुप्त माहितीच्या आधारे ताब्यात घेण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button