
रत्नागिरी जिल्ह्यात ९९६ नवीन शिक्षकांना नियुक्तीपत्र
रत्नागिरी जिल्ह्यातील नव्या शिक्षक भरतीसाठी पवित्र प्रणालीद्वारे निवड झालेल्या शिक्षकांना शाळा नियुक्त्या देण्यासाठी आयोजित समूपदेशन प्रक्रियेसाठी एकूण १ हजार ३८ शिक्षक-उमेदवारांना पाचारण करण्यात आले होते. सोमवार, मंगळवार अशा दोन दिवस पार पडलेल्या या समूपदेशनासाठी २६ शिक्षक उमेदवार गैरहजर राहिले असून ९९६ उमेदवारांनाा नियुक्तीपत्र देण्यात आली. हे सर्व शिक्षक नव्या शैक्षणिक वर्षापासून जिल्ह्यातील प्राथमिक शाळांवर हजर होणार आहेत.www.konkantoday.com