
लोटे एमआयडीसी परिसरात वारंवार होणार्या दुर्घटनेची उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांनी घेतली दखल.
रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठ्या औद्योगिक वसाहतींपैकी असलेल्या लोटे एमआयडीसीमध्ये अलीकडेच झालेल्या दोन भीषण रासायनिक दुर्घटनांमुळे जिल्ह्यात चिंता पसरली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांनी एमआयडीसीमध्ये उद्योजक आणि प्रशासकीय अधिकार्यांची सविस्तर आढावा बैठक घेतली. या बैठकीत मंत्री सामंत यांनी सर्व कंपन्यांनी त्यांच्या कारखान्यांमध्ये सुरक्षेचे नियम काटेकोरपणे पाळावेत आणि कामगारांच्या आरोग्य व सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे ठणकावून सांगितले.दुर्घटना होऊ नयेत यासाठी प्रत्येक कंपनीने आपापली जबाबदारी पार पाडणे आवश्यक आहे. सुरक्षितता यंत्रणा सक्षम करणे ही केवळ शासनाची नाही, तर प्रत्येक उद्योजकाची देखिल जबाबदारी आहे, असे ते म्हणाले. कामगारांसाठी आरोग्य सुविधा विकसित करण्याचे आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी कामगारांच्या आरोग्यासाठी खास कामगार रुग्णालय उभारण्याचे आश्वासन दिले. कामगारांच्या उपचारासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा लवकरच उभारण्यात येतील. एमआयडीसीमध्ये आरोग्य तपासणी शिबिरे, आपत्कालीन सेवा आणि तातडीच्या उपचारांसाठी वैद्यकीय यंत्रणा सज्ज ठेवली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.www.konkantoday.com