
निवडणूक कामासाठी १५ हजार ४४ कर्मचारी
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासनाच्या पातळीवर पुर्वतयारी सुरू असून निवडणूकपूर्व प्रशिक्षणाचे नियोजन केले जात आहे. या निवडणूक कामासाठी सर्व शासकीय व निमशासकीय कर्मचार्यांवर जबाबदार्या सोपविण्यात येत आहेत. सध्या या कामाची जबाबदारी वेगवेगळ्या विभागातल्या १५ हजार ४४ कर्मचार्यांवर सोपविण्यात आली आहे. मात्र त्यापैकी २०० हून अधिक कर्मचार्यांनी इलेक्शन ड्युटीतून वगळावे अथवा रजा मंजूर करावी, यासाठी विनंती अर्ज निवडणूक विभागाला सादर केला आहे. त्यामुळे आचारसंहिता जाहीर होताच अचानक सर्वच विभागातील कर्मचारी आजारी कसे पडू लागले, असा प्रश्न पडला. आहे.निवडणुकीची रणधुमाळी राजकीय पक्षांच्या भविष्यासाठी महत्वाची ठरते. मात्र तितकीच ही प्रक्रिया शासकीय आणि निमशासकीय कर्मचार्यांसाठी डोकेदुखी ठरते. निवडणुक काळातील प्रशासकीय काम तसेच प्रत्यक्ष मतदान व मतमोजणी प्रक्रियेसाठी हजारो कमंचार्यांची आवश्यकता भासते, रत्नागिरी जिल्ह्यात विविध विभागातील १५ हजार ४४ कर्मचारी निवडणुक प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आले आहेत. मात्र आचारसंहिता लागून १५ दिवस पूर्ण झाले नाहीत तोवर या कर्मचार्यांचे ड्युटीतून वगळावे, यासाठीचे अर्ज निवडणूक विभागाकडे येवू लागले आहेत. www.konkantoday.com




