
मुंबई – गोवा महामार्गाला पडला भला मोठा खड्डा.
मुंबई – गोवा महामार्ग २५:- महामार्गावरील झाराप ते पत्रादेवी बायपासवरील इन्सुली कुड़व टेंब येथे एक भले मोठ्या भागदाडासारखा, असा खड्डा पडल्याने वाहतुकीस मोठा धोका निर्माण झाला आहे. पावसामुळे माती खचल्याने हा खड्डा पडल्याची माहिती मिळाली आहे. या खड्यामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून, अपघाताची शक्यता वाढली आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी वाहनचालकांना हा खड्डा दिसणे कठीण असल्याने मोठा धोका निर्माण झाला आहे.
या मार्गांवर प्रवास करताना नागरिकांनी सतर्क राहुन आपला प्रवास करावा.निगुडे येथील माजी सरपंच झेवियर फर्नांडीस यांनी या गंभीर समस्येकडे महामार्ग प्राधिकरणाचे लक्ष वेधले आहे. त्यांनी तात्काळ यावर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी महामार्ग प्राधिकरणाने तातडीने दुरुस्ती काम हाती घ्यावे, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांकडून जोर धरू लागली आहे.