खेडमध्ये बँकेत कार्यरत असलेल्या तरूणीची गळफासाने आत्महत्या.

खेड शहरातील बस स्थानकाजवळील विदर्भ कोकण बँकेत कार्यरत ३२ वर्षीय तरूणीने भाड्याच्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. सुप्रिया विनायक वनशा (सध्या रा. पाटणे संकुल, कुंभारआळी, मूळगाव भाईंदर ठाणे) असे या मृत तरूणीच नाव आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.तिने नैराश्यातून आत्महत्या केल्याचे समजते. तरीही नेमक्या कोणत्या कारणातून तिने आत्महत्या केली आहे याचा पडताळा येथील पोलिसांकडून करण्यात येत आहे. ही तरूणी कुंभारआळी येथील पाटणे संकुलात भाड्याने वास्तव्यास होती. या खोलीतच तिने गळफास लावून आत्महत्या केली. बराच कालावधी उलटूनही कोणताही प्रतिसाद न आल्याने ती राहत असलेल्या खोलीचा दरवाजा तोडण्यात आल्यानंतर तिने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button