
राज्यभर गाजलेल्या मत्स्य अधिकार्यांवर बांगडा फेक प्रकरणी मंत्री नीतेश राणे निर्दोष.
राज्यभर गाजलेल्या मत्स्य अधिकार्यांवरील बांगडा फेकप्रकरणी विद्यमान मत्स्य व्यवसाय मंत्री नीतेश राणे यांच्यासह एकूण ३२ संशयितांची सिंधुदुर्ग जिल्हा न्यायाधीश १ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती व्ही. एस. देशमुख यांनी मुक्तता केली. मंत्री नीतेश राणे यांच्यासह अन्य संशयित आरोपींच्यावतीने ऍड. संग्राम देसाई, ऍड. सुहास साटम, ऍड. स्वरूप पई, ऍड. यतीश खानोलकर यांनी काम पाहिले.पर्ससीन नेटधारक मच्छिमारांची बाजू घेत पारंपारिक मच्छिमारांना त्रास दिला जात असल्याचा आरोप करीत त्यावेळी कॉंग्रेस पक्षात असलेले विरोधी पक्षाचे आमदार नीतेश राणे यांच्यासह काही लोकांचा जमाव मालवण येथील मत्स्य व्यवसाय प्रभारी सहाय्यक आयुक्त कार्यालयात गेला होता. यामध्ये मालवण व देवगड तालुक्यातील मच्छीमारांचा समावेश होता. यामधील कमलाकर मांजरेकर यांनी सहाय्यक आयुक्तांच्या टेबलावर पर्ससीनमधील बांगड्यांची टोपली ओतल होती. तर सहाय्यक आयुक्तांना जाब विचारण्यासाठी गेलेल्या नीतेश राणे यांनी प्रभारी सहाय्यक आयुक्त प्रदीप वस्त यांच्या तोंडावर बांगडा फेकला होता.www.konkantoday.com