राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान विभागस्तरीय कार्यशाळा उद्घाटन शासनाच्या उत्तम योजनेसाठी भाषेची अडसर नको -ज्येष्ठ साहित्यिक प्रकाश देशपांडे.

*रत्नागिरी, समाजाचे काय तरी देणे लागतो, या भावनेतून दरवर्षी विभागस्तरीय कार्यशाळेला सर्व ग्रंथपाल उपस्थित असतात. राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान यांच्या अर्थसहाय्यच्या विविध योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी भाषेची अडसर येऊ न देता, ती त्यांच्यापर्यंत पोहचवा, असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक प्रकाश देशपांडे यांनी केले. उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालयद्वारा आयोजित विभागस्तरीय राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान यांच्या अर्थसहाय्यच्या विविध योजनेविषयी विभागस्तरीय कार्यशाळेचे आज समिती सदस्य किरण धांडोरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. याप्रसंगी उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीकांत हावळे, कोकण विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष दिलीप कोरे, रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघ अध्यक्ष श्रीकृष्ण साबणे, ठाणे जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्रशांत पाटील, सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनिल हुसे आदी उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात श्री. देशपांडे म्हणाले, वाचन कमी होत चाललंय. वाचकांची संख्याही कमी होत आहे. माणसं एकमेकांशी बोलायचे कमी झालेत. केवळ मोबाईलवरील संदेशाद्वारे बोलत आहेत. ही परिस्थिती बदलायची असेल, तर घराघरात ग्रंथ घेऊन जावे लागेल. त्यांना मोफत वाचायला द्यावे लागतील. त्यामधून वाचनाची सवय वाढवावी लागेल. यावेळी दोन दिवसीय कार्यशाळेतील विविध सत्रांचा लाभ घेताना आर्थिक बाबीच्या योजनांचा लाभही घ्यावा, असे श्री. धांडोरे म्हणाले. यावेळी वाचन माणसाला समृध्द बनवते. पुस्तक वाचनामुळे मी घडलो, आजही पुस्तके वाचतो, असे श्री. गायकवाड यांनी सांगितले. श्री. साबणे, श्री. पाटील यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला राजा राममोहन रॉय आणि डॉ.एस आर रंगनाथन यांच्या प्रतिमांचे पुजन आणि दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. जिल्हा ग्रंथालय अधिकारी दीपक झोडगे यांनी स्वागत प्रास्ताविक केले तर हेमंत काळोखे यांनी आभार प्रदर्शन केले.000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button