उड्डाणपुलावरील बंद पथदीप सुरू करण्यासाठी महामार्ग विभागाचा पुढाकार
मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे येथील मध्यवर्ती ठिकाणी उड्डाणपुलावरील बंदावस्थेत असलेल्या पथदीपांमुळे वाहनचालकांची फसगत होत आहे. याबाबत वृत्त प्रसिद्ध होताच राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या अधिकार्यांनी बुधवारी प्रत्यक्षात पाहणी केली. महावितरणकडे तातडीने पत्रव्यवहार करून येत्या आठवडाभरातच सर्व पथदीप कार्यान्वित करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. www.konkantoday.com