
जिल्ह्यात चाेरट्यांचा सुळसुळाट, खेडमध्ये फफ्लॅट फोडून लाखाेचा ऐवज लंपास
खेड शहरातील खांबतळ्याजवळील इमारतीतील फफ्लॅट बंद असल्याची संधी साधत चाेरट्यांनी लाखाेंचा ऐवज लंपास केल्याची घटना शनिवारी रात्री उघडकीस आली. मध्यवर्ती ठिकाणच्या गजबजलेल्या इमारतीत झालेल्या घराेडीने एकच खळबळ उडाली आहे. चाेरट्यांच्या शाेधार्थ रविवारी श्वान पथकासही पाचारण करण्यात आले. अज्ञात चाेरट्यांवर येथील पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येथील चिकन व्यावसायिक अल्ताफ मुकादम यांच्या मालकीचा फफ्लॅट आहे. ते 2 मे राेजी कुटुंबीयांसमवेत बाहेर गेले हाेते. शनिवारी रात्री येथे परतल्यानंतर फफ्लॅटचा दरवाजा ताेडून कपाटातील साहित्य चाेरल्याचे निदर्शनास येताच धक्काच बसला साेन्याच्या अंगठ्यांसह 40 ते 50 हजार रुपयांची राेकड लंपास केल्याचे प्रथमदर्शनी समाेर आले आहे. त्यांची पत्नी अजूनही परगावीच आहे. त्यामुळे त्या येथे परतल्यानंतरच साेन्याचे दागिने नेमके किती चाेरीस गेले, याचा उलगडा हाेणार आहे. येथील पाेलीस निरीक्षक नितीन भाेयर हे राहत असलेल्या फफ्लॅटलगतच अल्ताफ मुकादम यांचा फफ्लॅट आहे. मात्र, तरीही चाेरट्यांनी मुकादम यांच्या फफ्लॅटवर डल्ला मारण्याचे माेठे धाडस केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. घराेडीची माहिती मिळताच पाेलीस निरीक्षक भाेयर यांनी चाचणीने घटनास्थळीची पाहणी करून श्वान पथकास पाचारण करण्याबाबत वरिष्ठांना सूचित केले. त्यानुसार श्वानपथकही येथे दाखल झाले. या घटनेनंतर पाेलिसांनी नाकाबंदी केली. पाेलिसांकडून साèया साèया शक्यता पडताळल्या जात आहेत. लवकरच चाेरट्यांच्या मुसक्या आवडण्यात यश येईल, असा विश्वास आहे येथील पाेलिसांनी व्यक्त केला आहे.www.konkantoday.com