अंतर माणसात ठेवा… माणुसकीत नको…!
चाकरमानी हे आपलेच आहेत ही भावना आता गावागावात रूजू लागली!

रत्नागिरी जिल्ह्यात सुरूवातीला कोरोनाचा विशेष प्रसार झालेला नव्हता. त्यामुळे इतर जिल्ह्याच्या मानाने रत्नागिरी जिल्हा कोरोनाच्या बाबतीत सुरक्षित असल्याचे चित्र सुरूवातीला होते. त्याचवेळी मुंबईत मात्र कोरोनाने हळुहळू हातपाय पसरल्याने कोरोनाचा कहर वाढू लागला होता. मुंबईत असलेल्या अपुर्‍या सुविधा व गावाकडे वाटणारी सुरक्षितता यामुळे मोठ्या प्रमाणावर चाकरमान्यांनी आपल्या मुळ गावी कोकणात धाव घेतली. मोठ्या प्रमाणावर चाकरमानी येत असल्याने सुरूवातीला गावकरी थोडेफार बिथरले होते. अर्थात मुंबईहून आलेल्या काही चाकरमान्यांना जिल्ह्यात आल्यानंतर कोरोनाची लागण झाल्याचे लक्षात आले होते. यामुळे या चाकरमान्यांमुळे गावात कोरोना येईल अशी भीती निर्माण झाली होती परंतु त्यानंतर चाकरमान्यांची मुंबईतील असलेली परिस्थिती व होणारी हालअपेष्टा हळुहळू गावकर्‍यांना समजू उमजू लागली होती. शेवटी हे चाकरमानी म्हणजेच आपलीच माणसे असल्याची भावना हळुहळू त्यांच्यात निर्माण होवू लागली. त्यामुळे अनेक गावात येणार्‍या चाकरमान्यांना गावाच्या बाहेर अथवा अन्य ठिकाणी राहण्याच्या सुविधा गावकर्‍यांनी उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे सुरूवातीला असलेली चाकरमानी आणि स्थानिक गावकरी ही दरी आता कमी झाली आहे.

येणार्‍या चाकरमान्यांनी नियमांचे पालन करून गावात आनंदाने रहावे अशी गावकर्‍यांचीही भावना आहे. यामुळे पाली गावातही अशाच गावकर्‍यांनी आपल्या गावात येणार्‍या चाकरमान्यांच्या स्वागतासाठी रस्त्यावर घोषवाक्य लिहून त्यांचे स्वागत केले आहे. पाली गावाला आपण ग्रीन झोन ठेवूया… घरी रहा… सुरक्षित रहा… अंतर माणसात ठेवा… माणुसकीत नको… अशा भावनात्मक घोषवाक्ये लिहून त्यांनी चाकरमान्यांचे स्वागतही करण्यास सुरूवात केली आहे. अर्थात येणार्‍या चाकरमान्यांनी देखील या सर्वाला प्रतिसाद देवून नियमांचे पालन केल्यास कोरोनाला आपण सहज रोखू शकणार आहोत. पाली गावच्या ग्रामस्थांनी दाखवलेल्या या चांगल्या उपक्रमाची अंमलबजावणी जिल्ह्यातील गावातही झाल्यास मुंबईतील चाकरमान्यांना आपल्या गावचा खरोखर आधार वाटू शकणार आहे.
www.konkantoday.com

Buy products from Amazon and get good offers

Mush N95 6 layer Reusable Face Mask with Nose Pin – Pack of 4 price- 494.00 ( pack of 4)

click on Image below to buy product

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button