
पश्चिम बंगालमार्गे महाराष्ट्रात बांगलादेशींची घुसखोरी, चिपळुणातून अटक केलेल्या घुसखोर बांगलादेशींकडून धक्कादायक माहिती
रत्नागिरी दहशतवाद विरोधी पथकाने चिपळुणातून अटक केलेल्या घुसखोर बांगलादेशींकडून धक्कादायक माहिती पुढे आली आहे. पोलीस तपासात हे लोक पश्चिम बंगालमार्गे कलकत्त्याहून पुढे महाराष्ट्रात घुसखोरी करीत असल्याची माहिती पुढेआली आहे. पोलीस तपासात हे लोक पश्चिम बंगालमार्गे कलकत्त्याहून पुढे महाराष्ट्रात घुसखोरी करीत असल्याची माहिती समोर आली आहे. अतिशय गंभीर बाब म्हणजे कलकत्ता ठिकाणी ते आवश्यक कागदपत्रे तयार करून त्या आधारावर महाराष्ट्रात कित्येक वर्ष आश्रय घेतात. बांगलादेशी असल्याचा कुणालाही संशय येवू नये, म्हणून उदरनिर्वाह साधन म्हणून त्यांनी बांधकाम क्षेत्र निवडले असल्याचेही स्पष्ट होत आहे.काही दिवसांपूर्वी रत्नागिरी दहशतवाद विरोधी पथकाने रूखसाना आलमगीर मंडल, आलमगीर अरबली मंडल या बांगलादेशी पती-पत्नीला शहरातील रावतळे येथून ताब्यात घेत अटक केली. त्या दोघांना न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. www.konkantoday.com