सिंधुदुर्गात कणकवली येथील उड्डाणपुलाचा काँक्रीट ओतत असताना काही भाग कोसळला

मुंबई गोवा महामार्गावर हायवे ठेकेदार दिलीप बिल्डकॉनच्या निकृष्ट कामाचा पुन्हा एक नमुना कणकवली कराना पाहायला मिळाला शुक्रवारी कणकवली येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात येथे सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमाराला हा प्रकार घडला
उड्डाणपुलाचे काम सुरू असतानाच त्यावर काँक्रीट ओतत असतांना उड्डाणपुलाचा काही भाग कोसळला. काँक्रीटचा लोड स्टील ने घेतला नसल्याने हे पूल कोसळले असल्याचे प्राथमिक अंदाज आहे. मात्र जीवितहानी झाल्यावरच ठेकेदार सुधारणार का ? असा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाच्या दर्जाबाबत नागरिकांनी याआधीही तक्रारी केल्या आहेत
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button