मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गांवर तुरळ फाटा येथे ट्रॅव्हल्स बस आणि डंपरचा अपघात


मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गांवर तुरळ फाटा येथे ट्रॅव्हल्स बस आणि डंपरचा अपघात झाला. या अपघातात ट्रॅव्हल मधील 21 प्रवाशांना किरकोळ मार लागला असून, संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले.कोपरखैरणे येथून गणपतीपुळे येथे आलेले भक्तगण पुन्हा कोपरखैरणे येथे परतीच्या मार्गांवर जात असताना त्यांची ट्रॅव्हल बस एम. एच. 43 सीई 4293 ही मुंबई -गोवा महामार्गांवरून जात असताना संगमेश्वर तालुक्यात येणार्‍या तुरळ फाटा येथे आली असता त्या ट्रॅव्हल बसच्या पुढे असलेच्या एम. एच. 12 डब्ल्यू जे. 4751) या डंपर चालकाने त्याला उजव्या बाजूला जायचे आहे. हे साईड इंडिकेटरने न दर्शवता अचानक गाडी उजव्या बाजूला वळवल्याने ट्रॅव्हल बस डंपरच्या मागे जाऊन जोरात धडकली.

डंपरला ट्रॅव्हल बसची धडक जोरात बसल्याने ट्रॅव्हल बसच्या पुढच्या भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.असून ट्रॅव्हल चालकासह 21 प्रवाशांना किरकोळ मार लागला असून त्यांच्यावर संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button