
चिपळूण शहरातील विरेश्वर तलाव परिसरात खासगी बसचालकांचे बेशिस्त पार्किंग
चिपळूण शहरातील विरेश्वर तलाव परिसरातील मार्गावर खासगी बसेसचे बेशिस्त पार्किंग केले जात असून यामुळे वाहतुकीचा मुख्य रस्ता व्यापला जात आहे. अपुर्या रस्त्यांअभावी वाहतूकोंडी होत असून ये-जा करणार्या नागिरकांना पुरेशी जागा नसल्याने यामुळे एखादी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच भर रस्त्यात या गाड्या धुण्याचा घाट घातला जात आहे. विशेष म्हणजे यावर अधून मधून कारवाई होत असली तरी याचा कोणताच परिणाम या वाहतूक व्यावसायिकांवर होत नसल्याचे दिसून येत आहे.
www.konkantoday.com




