
खेड तालुक्यातील खालचीवाडी, सुसेरी येथे एका धक्कादायक घटनेत वडिलांवर त्यांच्या मुलाने अॅसिड टाकल्याची घटना.
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील खालचीवाडी, सुसेरी येथे एका धक्कादायक घटनेत वडिलांवर त्यांच्या स्वतःच्या मुलाने अॅसिड टाकल्याची घटना घडली आहे.याप्रकरणी खेड पोलिस ठाण्यात दि.10 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अनिल हिरू देवळेकर (वय 62, रा. सुसेरी नं. 2, खालचीवाडी) हे सेवानिवृत्त असून, त्यांचेच पुत्र मंगेश अनिल देवळेकर (वय 23) याने घरात असताना त्यांच्यावर शिवीगाळ करत अचानक अॅसिड फेकले. या हल्ल्यात अनिल देवळेकर यांच्या चेहर्यावर, डोळ्यांवर, ओठांवर आणि पाठीवर गंभीर दुखापत झाली आहे. उपचार घेतल्यानंतर उशिराने त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी खेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सुरू आहे.