
चिपळूण तालुक्यातील बोरगाव वेलेवाडी येथील युवकाची गळफासाने आत्महत्या
चिपळूण तालुक्यातील बोरगाव वेलेवाडी येथील १९ वर्षीय ओमकार मंगेश हुमणे या महाविद्यालयीन युवकाने गळफास घेत आत्महत्या केली आहे. ही घटना रविवारी घडली.
ओमकार हा गुहागर तालुक्यातील एका नामांकित महाविद्यालयात बी. कॉम. च्या प्रथम वर्षात शिकत होता. रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास त्याने आपल्या घराच्या शेजारील घराच्या पडवीमध्ये गळफास लावून आत्महत्या केली.
यानंतर चिपळूण चिपळूण पोलिसांना देण्यात आली. या घटनेची माहिती तत्काळ उपविभागीय पोलीस अधिकारी बेले, पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे घटनास्थळी दाखल झाले. संध्याकाळी उशिरापर्यंत जबाब नोंदवण्याचे काम सुरू होते. अद्यापही आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. मृतदेह शवविच्छेदनासाठी चिपळूण कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.www.konkantoday.com




