
मुंबई-गोवा महामार्गावरील निवळी घाटात अपघातग्रस्त ट्रकला आग.
मुंबई-गोवा महामार्गावरील निवळी घाटात अपघातग्रस्त झाल्यानंतर ट्रकने पेट घेतला. ही आग एवढी भयानक होती की, ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला. ही घटना गुरूवारी रात्री ९.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात ट्रक क्लिनर प्रकलश बुधिया चौहान (३८) किरकोळ जखमी झाला असून त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत.ट्रकचालक अकबर जाफर अली (२८) हा ट्रक (ए:पी ०९ एचएच २०५४) जयगडहून मध्यप्रदेशच्या दिशेने घेवून जात होता. निवळी घाट येथे कोळसा वाहतूक करणार्या या ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने तो डोंगराच्या कठड्यावर जावून आदळला. यानंतर ट्रकने पेट घेण्यास सुरूवात केली. यावेळी स्थानिक रहिवाशांनी तातडीने या घटनेची खबर अग्निशमन दल व पोलीस प्रशासनाला दिली. ट्रकमध्ये असलेल्या कोळशामुळे ट्रकने भीषण पेट घेतला. दरम्यान घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणली.www.konkantoday.com