
मुंबई-गोवा महामार्गावर लांजा-कुंभारवाडी येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचार्याचा जागीच मृत्यू.
लांजा येथे अज्ञात वाहनाने भरधाव वेगाने धडक दिल्याने अज्ञात पादचारी व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मुंबई-गोवा महामार्गावर लांजा-कुंभारवाडी-सरगम लॉजसमोर मंगळवारी ६ मे रोजी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी लांजा पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०६, २८१, १२५ (अस), १२५ (ब), मोटर वाहन कायदा कलम १८४, १३४/१७७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेश कांबळे करत आहेत.www.konkantoday.com