जिल्हा शासकीय रूग्णालयातील कोट्यावधींच्या देयकापैकी आयकर विभागाकडे टीडीएस रक्कम भरणा नाही, कोषागार कार्यालयाने घेतला आक्षेप.

कोणत्याही देयकाची रक्कम विविष्ट मर्यादेच्या बाहेर झाली तर तो रक्कम देताना २ टक्के एवढ्या प्रमाणात कापून घ्यावी आणि आयकर खात्याकडे टीडीएस म्हणून ती जमा करावी, असा नियम बर्‍याच वर्षापूर्वी लागू झाला. जिल्हा शासकीय रूग्णालयातील देयकांच्याद्वारे कोट्यावधींची रक्कम वितरित झाली. पण गेल्या ५ वर्षात लाखो रुपयांची रक्कम जमाच न केली गेल्याचा मुद्दा पुढे आला आहे. यावर कोषागार कार्यालयाने आता बोट ठेवले आहे.

जिल्हा शासकीय रूग्णालयात औषधे खरेदी, विविध बांधकामे, विविध विकासकामे याद्वारे वस्तू आणि सेवा घेतल्या जात आहेत. खासगी सेवा पुरवठादार त्याचबरोबर वस्तू विक्रेते यांनी सादर केलेल्या बिलांच्या रकमा अदा केल्या जातात. २०१९ पासून विविध सेवा पुरवठादार आणि वस्तू विक्रेते यांच्या रकमा देत असताना आयकर खात्याने घालून दिलेल्या टीडीएस कपातीची कार्यवाही झालेली नाही, असा आक्षेप घेण्यात आला.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button